पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांनी संस्थानात शैक्षणिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली : सुरेश गावडे

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 16:07 PM
views 121  views

सावंतवडी : सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व राजे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांनी आपल्या कार्य काळात संस्थानात शैक्षणिक प्रगतीची रोवलेली मुहूर्तमेढ रोवली. तसेच शैक्षणिक उपक्रमांसह जनतेच्या हितासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. त्यामुळेच महात्मा गांधींनी या संस्थानचा राम राज्य असा गौरव केला होता. असे प्रतिपादन आंबोली येथील सैनिक स्कूलचे निवृत्त प्राचार्य सुरेश गावडे यांनी केले.

दाणोली येथील साटम महाराज वाचनालयाच्यावतीने सावंतवाडी संस्थांनचे अधिपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन 'पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज समजाऊन घेताना' या व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी सुरेश गावडे बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गावडे, देवसू माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ राऊळ, माडखोलचे माजी सैनिक सहदेव राऊळ, माजी उपसरपंच अँड सुरेश आडेलकर, वाचनालयाचे सचिव डॉ एल डी सावंत, उपाध्यक्ष भास्कर परब, मळगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत,     शुभांगी शिरोडकर, गिरीधर चव्हाण, दीपा सुकी, सौ चव्हाण आदी उपस्थित होते. 

यावेळी भरत गावडे यांनी सावंतवाडी संस्थानातील सैनिकी परंपरा आणि बापूसाहेबांचे लक्शरातील कार्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ लवू सावंत, विश्वनाथ राऊळ, श्रद्धा सावंत सौ शिरोडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तरुण पिढीला वाचनाची सवय लागावी तसेच आपल्या संस्थानचे भूतपूर्व राजे यांची कर्तगारी व इतिहास कळावा तसेच ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्याना बापूसाहेब महाराज यांचे शैक्षणिक, सामाजिक, लष्करी सेवा, आरोग्य, जनतेबाबत कळवळा, प्रौढ साक्षरता, कृषी विषयक माहिती, संतांचे साहित्य, न्यायप्रियता व रामराज्य आदी चौफेर कार्य व सेवा तरुण पिढीला समजावे. या उद्देशाने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. 

चार दिवस सुरू असलेल्या या व्याख्यानमाले निमित्त भरत गावडे यांनी कुणकेरी शाळा नं १ मध्ये बापूसाहेब महाराजांचे सामाजिक कार्य, माडखोल माध्यमिक विद्यालयात बापुसाहेब महाराज यांचे रामराज्य, शिरशिंगे पावणाई रवळनाथ विद्यालयात  गुरू शिष्य परंपरा व बापू साहेब महाराज व सदगुरू साटम महाराज या दोन सत पुरुषाचे नाते, शिरशिंगे शाळा नं १ मध्ये भारतीय संस्कृती व गुरू शिष्य परंपरा, कारीवडे भैरववाडी प्राथमिक शाळेत बापूसाहेब महाराज यांचा आरोग्य विषयक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले. या सर्व व्याख्यानांना सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.