
सावंतवाडी : दीपक केसरकर म्हणतात पूर्वी मंत्रिमंडळात असताना पाच वर्षे स्वतःची प्रॉपर्टी विकून शिवसेना वाढविली. आम्ही देखील सार्वजनिक जीवनात अनेक वर्षांपासून काम करत आहोत. अनेक मंडळात, संघटनेत काम केले. दीपक केसरकर यांना अनेक वर्षापासुन ओळखतो. कदाचित त्यांनी विकली असेल प्रॉपर्टी. पण, पूर्वी पाचशे हजार रुपये वर्गणी देताना हजार वेळा विचार करणारे दीपक केसरकर आता मात्र हजारो, लाखो रुपयांच्या वर्गणीची पाकिटे न मागता पाठवून देत आहेत. ही जादू झाली कशी ? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केसरकरांना टोला हाणला आहे. शिंदे सेना वाढविण्यासाठी दीपक केसरकर खोक्यातून आलेले पैसे वाटत आहेत की आता पुन्हा स्वतःची एखादी प्रॉपर्टी विकली हे देखील त्यांनी जाहीर करावे असं आव्हान देत
दीपकभाई, पब्लिक सब जानती है ! भावनेच्या राजकारणाचे दिवस संपले आता विकासाच्या राजकारणावर बोला. तुमचा राजकीय विकास किती झाला आणि मतदारसंघाचा विकास किती झाला हे जनता पाहते आहे. त्यामुळे एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही लोकांना फसवू शकता नेहमी नेहमी नाही.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला आता अर्चना घारे- परब यांच्या रूपाने नवीन कार्यक्षम नेतृत्व मिळाले आहे. महिला असूनही त्या समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचत आहेत. अत्यंत तळमळीने लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. महिला विश्वासाने त्यांच्याकडे आपली गार्हाणी घेऊन येत आहेत. विद्यार्थी, युवक त्यांच्याकडे एक आश्वासक नेतृत्व म्हणुन पाहत आहेत. आणि हेच केसरकर यांचे मुख्य दुखणे आहे. त्यामुळे त्यांच्या जे पोटात होते ते वर्षभरानंतर आता ओठावर आले आहे असा टोला पुंडलिक दळवी यांनी हाणला.