पुंडलिक दळवींनी जनतेच्या हृदयात मिळवलं स्थान | वाढदिनी मान्यवरांचे उद्गार !

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 17:17 PM
views 133  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.‌ यावेळी सर्वस्तरातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पुंडलिक दळवी यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. भविष्यात त्यांना निश्चितच जनता काम करण्यास बळ असं मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी व्यक्त केले. 

वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई मित्रांना धान्य वाटप करण्यात आलं. या कर्मचार्‍यांना हातभार द्यावा या उद्देशाने त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पुंडलिक दळवी यांची कन्या श्रीया दळवी हिच्या हस्ते करण्यात आले. दोन महिन्याचे वेतन झालेलं नसल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई मित्रांनी अलिकडेच एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते. मात्र, सावंतवाडी शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने नागरिकांना वेठीस न धरण्याच्या विनंतीला मान देऊन ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले. आजही ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून पुंडलिक दळवी यांनी सफाई मित्रांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तर शिरोडा नाका येथील दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रात साजरा करण्यात आला. यावेळी येथील दिव्यांग मुलांसोबत केक कापून व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग मुलांच्या प्रेमानं पुंडलिक दळवी यांना आनंदाश्रू आवरता आले नाही. 

दरम्यान, वाढदिवनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बाळ कनयाळकर, नकुल पार्सेकर,

समीर वंजारी, संदीप गवस यांनी मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्ता कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे पुंडलिक दळवी आहे. एक गट फुटून सत्तेत सामील होत असताना शरद पवार यांच्यासोबत कायम राहणार असल्याचा पहिला फोन करणारे पुंडलिक दळवी होते असं ते म्हणाले. तर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी शुभेच्छा देताना पुंडलिक दळवी यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. भविष्यात त्यांना निश्चितच जनता काम करण्यास बळ असं मत व्यक्त केले. पुंडलिक दळवी यांनी आपल्या मनोगतात उपस्थित मान्यवरांचे ऋण व्यक्त केले. दिव्यांग मुलांसोबत साजरा केलेला वाढदिवस जीवनातील सर्वात अविस्मरणीय असा होता असं मत त्यांनी व्यक्त केल.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भास्कर परब, शिवदत्त घोगळे, बाळ कणयाळकर, अँड. नकुल पार्सेकर, समीर वंजारी, नझिर शेख, देवेंद्र टेमकर, हिदायतुल्ला खान, सचिन पाटकर, सावली पाटकर, राकेश नेवगी, बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, बाबल्या दुभाषी, याकुब शेख, नियाज शेख, बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, पुजा दळवी, श्रीया दळवी, भुवन दळवी, विनायक परब,बाळ सावंत, विशाल जाधव, अजय गोंदावळे, विनोद सावंत, हेमंत बांदेकर, परिक्षीत मांजरेकर, निलेश मेस्त्री, किशोर सावंत, योगेश चांदेलकर, संदीप गवस, सुदेश तुळसकर, वैभव परब,सायली दुभाषी, प्रसाद दळवी, अमोल दळवी, प्रिया परब आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन पाटकर, सुत्रसंचालन हिदायतुल्ला खान तर आभार देवेंद्र टेमकर यांनी मानले‌.