भंडारी समाज बांधवांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन | शेखर गांवकर, सुधीर आडीवरेकर यांची उपस्थिती

Edited by: विनायक गांवस
Published on: December 29, 2022 11:57 AM
views 251  views

सावंतवाडी : भंडारी समाज भवन सावंतवाडी येथे ज्ञाती बांधवांच्या माध्यमातून नववर्षाच्या दिनदर्शिकेच प्रकाशन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक शेखर गांवकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी भंडारी मंडळाकडून शेखर गांवकर, सुधीर आडीवरेकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शेखर गावकर म्हणाले, समाजबांधवांनी केलेला सन्मान म्हणजे आपल्या माणसांनी केलेला सन्मान आहे. भविष्यात काम करण्यासाठी हा सत्कार ताकद देणारा आहे. समाज मंडळात काम करत असताना राजकारण यात येऊ देणार नाही. जे ज्ञाती बांधव नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेत त्यांचा भंडारी समाज मंडळाकडून सन्मान करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर म्हणाले, समाज बांधवांनी पाठिवर थाप मारली की जोमानं काम करण्यासाठी छाती भरून येते. समाजातील नागरिकांसाठी व समाजबांधवांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते असं मत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शेखर गांवकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, मंडळाचे उपाध्यक्ष गुरूनाथ पेडणेकर, प्रसाद अरविंदेकर, देवीदास आडारकर, शीतल नाईक, वैशाली पटेकर, समता सुर्याजी, संतोष वैज, दिलीप पेडणेकर, चंदू वाडकर, नामदेव साटेलकर, किशोर चिटणीस, श्री. कोंडये, सिद्धार्थ पराडकर, दर्शना पेडणेकर, अपेक्षा साटेलकर, लक्ष्मी सावंत, संगिता हडकर, देवता पेडणेकर, शामल धुरी आदी उपस्थित होते.