अनिल परुळेकर यांच्या 'नाममंत्र' पुस्तकाचे पंढरपूर येथे प्रकाशन !

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 04, 2023 20:14 PM
views 390  views

सावंतवाडी : श्री क्षेत्र पंढरपूर येथे १ फेब्रुवारी २०२३ रोजी सावंतवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा हभप अनिल परुळेकर यांच्या 'नाममंत्र'  पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जाधवजी जेडामाई धर्मशाळेत माघ वारीच्या दिवशी पार पडला.

या पुस्तकाचे लेखक हभप आबा ऊर्फ अनिल परुळेकर हे सावंतवाडीचे सुपुत्र असून त्यांचे माठेवाडा येथे वास्तव्य आहे. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९३९ साली मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कळसुलकर हायस्कूलमध्ये झाले. सावंतवाडी कळसुलकर शाळेमध्ये विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली त्यामध्ये ते एक हिस्सा बनले. त्यांनी १९६२ मध्ये व्हीजेटीआय मध्ये मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअर ही पदवी मिळवली. १९६२ मध्ये कोईम्बतूर येथे इंजिनिअर म्हणून नोकरी केली. त्यांना साहित्यामध्ये आवड असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत चार पुस्तके लिहिली. त्यामधील हे प्रथम पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन पंढरपूर येथील धर्मशाळेचे मालक  दानशूर शेठ भरतभाई, तसेच दीपक अटक (बंधू) सौ. उज्वला अटक (भगिनी) या मान्यवरांच्या हस्ते झाले.  यावेळी शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा परुळेकर मुंबई, दिगंबर कांबळे कर्जत, लक्ष्मणबुवा जाधव कर्जत, विशालबुवा मालाडकर कल्याण, श्रीमती पेडणेकर काकी म्हापसा गोवा, श्रीमती ताई कांदळगावकर मानरतुर्द मुंबई उल्हास, कांबळे नवीन पनवेल, सचिन दानवले कर्जत, नितीन कर्णिक घाटकोपर, सुमन खोबरेकर ठाणे, मनोहर कुबल बदलापूर, सखाराम उर्फ दादा मालाडकर, कांबळे मालवण, गोपाळ जोशी विठ्ठलवाडी, सौ. विना मोर्जे  राजापूर, मदन जुळाटकर नवी मुंबई आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.