दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा | सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 14, 2024 13:42 PM
views 86  views

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ मुंबादेवी येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. यावेळी दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत, काँग्रेस चे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी चे नेते जयंत पाटील, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, आमदार आमीन पटेल, अरुणभाई दुधवडकर यांच्या सहित महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते.