स्वच्छतेसाठी गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 02, 2024 13:23 PM
views 651  views

देवगड : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी नियोजन व गावपातळीवर वर्तणूक बदल करण्यासाठी अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी व गावपातळीवर स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहण्यासाठी  ग्रामपंचायत किंजवडे येथे  सरपंच संतोष किंजवडेकर व ग्रामसेवक शिवराज राठोड गृहभेटी देऊन स्वच्छतेबाबत कुटूंबांशी संवाद साधत आहेत .

 गावपातळीवर “स्वच्छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा” संकल्पनेची मोहिमेची अंमलबजावणी बाबत नियोजन  ग्रामपंचायत किंजवडेने केले असुन यात सवांदक म्हणून सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही, बचत गट महिला अशा एकुण  मनुष्यबळांला गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, संपुर्ण ग्रामीण भागातील शाश्वत स्वच्छता टिकविणे आणि हागणदारीमुक्त अधिकची स्थिती कायमस्वरुपी राखणे, वैयक्तिक स्वच्छता याबाबत संवादक गावातील  कुटुंबांना भेट देणार असुन कुटुंबांना भेट देतानाचा फोटो गुगल फॉर्म वर अपलोड करण्यात येणार आहेत . त्याच बरोबर सदर गुगल फॉर्म मध्ये भेटी देण्यात येणाऱ्या गावातील सर्व कुटुंबांची माहिती भरण्यात येणार आहेत .