
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग पोलीस दलाच्यावतीने 26 जून 2024 संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन निमित जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
न्यू इंग्लिश स्कूल ओरोस बुद्रुक, रानबांबुळी विद्यार्थ्याची अंमली पदार्थाचे दुष्परिणाम यावर निबंध स्पर्धा दोन वयोगटांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. 26 जून या जागतिक आमली पदार्थ विरोधी दिणादिबही शाळेतील मुलांना अंमली पदार्थ जनजागृती विषयी मार्गदर्शन करून अंमली पदार्थ किती घातक आहेत याचबरोबर नवीन अस्तित्वात आलेले कायद्यांच्या तरतुदीं बाबत तसेच ड्रग्सचे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आलेली. तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे *खोड* लघुपट प्रसिध्द करण्यात येणार असुन तो सर्वांनी आवर्जुन बघावा असे आव्हाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना भविष्यात ते कॉलजमध्ये गेल्यानंतर नवनविन मित्र भेटतील तेव्हा बिअर पिल्याने बॉडी बनते, सिगरेट पिल्ली तर स्टेटस उंचावतो, पार्टी करायची असेल तर दारुविना ती कोरडीच असते, दु:खात दारु पिल्ली तर सहन करण्याची शक्ती येते व दु:ख कमी होते किंवा दारु पिल्ली तर डेअरींग येते असे सांगुन अंमली पदार्थांच्या आहारी जाण्याची जास्त संभावना आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आवश्यक ते मार्गदर्शन करुन आयोजित निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेले मुलांचे क्रमांक काढून त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल ओरोसचे मुख्याध्यापक अशोक रायबान,शिक्षक अशोक गिते,ओरोस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर,महिला पोलिस हवालदार कोमल नागरगोजे, पोलिस नाइक रुपेश नाईक, पोलिस नाइक शैलेश सोन्सुरकर, महिला पोलिस शीपाई शितल नांदोस्कर, पोलिस शिपाई प्रथमेश ओरोसकर शिक्षकवृंद व विद्यार्थी आदी उपस्थित होते.