पु. लं. च्या साहित्यात जीवनाचा वेध : मंदार ओक

देवगडमध्ये व्याख्यानमालेचे उद्घाटन
Edited by:
Published on: January 05, 2024 17:36 PM
views 64  views

देवगड : माणसाच्या अनुभवातून मेळ घालणारे चिंतन म्हणजे साहित्य. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी आपल्या विविधांगी साहित्यातून जीवनावर भाष्य केले आहे. असे मत व्याख्याते मंदार ओक (चिपळूण) यांनी व्यक्त केले. पु ल देशपांडे यांच्या साहित्याच्या विविध पैलूंची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

येथील उमाबाई बर्वे ग्रंथालय, स्नेहसंवर्धन मंडळ आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे यंदाचे तेरावे वर्ष होते.व्याख्यानमालेचे पहिले पुष्पगुंफताना "तत्वचिंतक पु.ल." या विषयावर ओक यांनी विचार व्यक्त केले. व्याख्यानमालेचे उद्घाटन त्यांच्यात रस्ते दीप प्रज्वलनाने झाले.

यावेळी आयोजकांच्यावतीने ओक यांचा शाल,श्रीफळ,पुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एक पुस्तक ओक यांनी ग्रंथालयाला भेट म्हणून दिले. मंचावर माजी आमदार एडवोकेट अजित गोगटे, चारुदत्त सोमन, एडवोकेट अभिषेक गोगटे, एस एस पाटील, बर्वे ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक, दत्तात्रय जोशी,उत्तरा जोशी, सचिन खवळे, महेश कानेटकर,ग्रंथपाल प्रशांत बांदकर,आदी उपस्थित होते.यावेळी ओक यांनी पु .ल देशपांडे यांचे बालपण, त्यांचा हजरजबाबीपणा, यांची विनोद बुद्धी, त्यांचे साहित्य आणि विचार तसेच साहित्यामधील विविधांगीपणा या अनुषंगाने विवेचन केले. योग साधनेसाठी उत्तम मन आणि सुदृढ शरीर आवश्यक असते,असे सांगतानाच पु . ल. देशपांडे यांच्या साहित्यातील व्यक्तीरेखांविषयी माहिती दिली. काही व्यक्ती रेखांचे वाचन करून दाखविले पाहून्यांचा परिचय उत्तरा जोशी यांनी, सूत्रसंचालन सागर कर्णिक यांनी केले. "वंदे मातरम" प्रांजली कानेटकर हिने सादर केले.