
वैभववाडी : कुडाळ येथे आ.भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण, माजी खा.निलेश राणे व भाजपा नेत्यावर केलेल्या टिकेवरुन भाजपा आक्रमक झाली आहे. आ.जाधव यांच्या विरोधात निषेध रँली काढण्यात आली. जोरदार घोषणाबाजी करीत पोलीस स्थानकात निवेदन दिले.
आ.वैभव नाईक यांच्या ACB चौकशी विरोधात मंगळवारी महाविकास आघाडीने कुडाळ येथे मोर्चा काढला होता. या मोर्चाच्यावेळी आ.भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खा.निलेश राणे यांच्या जोरदार टीका केली होती. त्याचे पडसाद आज वैभववाडीत उमटले. भाजपने आ.जाधव यांच्या विरोधात शहरात निषेध रँली काढली. कुत्र्याच्या गळ्यात भास्कर जाधव यांच्या नावाची पाटी अडकून त्याला फिरविण्यात आले. निम का पत्ता कडवा है, भास्कर जाधव भडवा है, गली गली मे शोर है, भास्कर जाधव चोर है, अशा घोषणा देण्यात आल्या.
आ.जाधव यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी तालुका अध्यक्ष नासीर काझी, भालचंद्र साठे,अरविंद रावराणे, बाळा हरयाण,राजेंद्र राणे,महीला तालुका अध्यक्ष प्राची तावडे,नगराध्यक्ष नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत,रोहन रावराणे,विवेक रावराणे,स्वप्नील खानविलकर, बंड्या मांजरेकर, किशोर दळवी,सुनिल भोगले,समाधान साळुंखे,विनायक रावराणे,अवधूत नारकर, दत्ताराम सावंत,प्रदीप नारकर,दाजी पाटणकर,उदय पांचाळ यसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.