मंडणगडमध्ये आतंकवादी हल्ल्याचा निषेध

शहरातून निघालेला मोर्चा तहसीलवर धडकला | जोरदार घोषणाबाजी
Edited by:
Published on: April 28, 2025 20:04 PM
views 34  views

मंडणगड : जम्मू - काश्मीर मधील पहलगामच्या घाटीमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मंडणगड मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने 28 एप्रिल 2025 रोजी मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. मोर्चात पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देवून निषेध व्यक्त करण्यात आला याबरोबर तहसिल कार्यालय मंडणगड येथे अनेक मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.     पहलगमच्या घाटी मध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ल्याच्यावेळी आतंकवाद्यांनी तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव, धर्म, विचारला आणि जे हिंदू पर्यटक होते त्यांची हत्या करण्यात आली. हे खूप संतापजनक आहे. या घटनेचा देशभर निषेध व्यक्त केला जात आहे. मंडणगड मधील सकल हिंदू समाज या घटनेच्या निषेधार्थ एकटवला. (28) रोजी सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास  शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथे मोठ्या संख्येने हिंदू बांधव जमा झाले. यावेळी काढण्यात आलेल्या मोर्चातील जोरदार घोषणांच्या आवाजाने शहरपरीसर दणाणून गेला. शहरपरीसरातून हा मोर्चा भिंगळोली येथील तहसील वर धडकला. 

तहसील परिसरात सकल हिंदू समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उपस्थितांना संबोधित करत एकत्रित राहण्याचे आवाहन केले. यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदार अक्षय ढाकणे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी सकल हिंदू समाजाचे सचिन शेठ, विनोद जाधव, निलेश गोवळे, वैभव कोकाटे, प्रमोद काटकर, दत्तात्रय लेंढे, अनंत शिंदे, अशोक गोविलकर, शेजल गोवळे, दीपक घोसाळकर, प्रवीण कदम, श्रीपाद कोकाटे, सुनील मेहता,  प्रवीण जाधव, संतोष घोसाळकर, नितीन म्हामूणकर, योगेश जाधव, सिद्धेश गुजर, विजय भागवत, गिरीश जोशी, दादा कोकाटे, नागेश घोसाळकर, अमिता शिंदे, सिद्धेश देशपांडे, जितेंद्र सापटे, श्रीकांत कपडेकर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.