
दोडामार्ग : दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या एसएससी बॅच 2007-08 व 2008-09 च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या भौतिक सुविधांची गरज लक्षात घेऊन सुमारे ४५ हजार रुपये किंमतीची साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली. सन 2007-08 च्या दहावीच्या बॅचची विद्यार्थिनी कैरवी चांदेकर व तिच्या सहकारी मित्रांनी शाळेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही साऊंड सिस्टीम शाळेकडे सुपूर्द केली. या साऊंड सिस्टीमचा उपयोग शाळेतील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होणार आहे.
माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल संस्थाध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, तसेच मुख्याध्यापक संजय पाटील, पालक-शिक्षक संघाचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.










