पहलगाम हल्ल्याचा देवगडात निषेध

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 26, 2025 12:53 PM
views 163  views

देवगड : देवगड जामसंडे येथील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळाच्या पटांगणावर पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली व या हल्लाचा देवगड सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, भाजप तालुकाध्यक्ष सदाशिव उर्फ भुजबळ, नगरसेवक शरद ठुकरूल, उल्हास मणचेकर, योगेश चांदोस्कर, बाळा खडपे, रविंद चिंदरकर, मिलिंद कुबल, सुनील बापट, महेश कानिटकर, ओंकार देवधर, शैलेश खाडिलकर, जगदीश गोगटे, सागर दळी, रणजीत हिर्लेकर,अँड अभिषेक गोगटे, राहुल गोगटे, भाई बांदकर, डॉ यश वेलणकर, दत्ताराम घाडी, मधुसूदन फाटक, कौस्तुभ खाडिलकर, स्पृहा गोगटे, अक्षता घाडी, अजित टाककर, योगेश घाडी व अन्य  हिंदू समाज बांधव उपस्थित होते.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे निरपराध २८ पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध करण्यासाठी व त्या भ्याड हल्लात बळी पडलेल्या निरपराध भारतीयांना देवगड तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सकल हिंदू समाज यांच्यावतीने ही श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भ्याड अतिरेकी हल्ला करणाऱ्या इस्लामिक आतंकवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.