
वेंगुर्ले : पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे धर्मांध दहशतवाद्यांकडून भारतीय नागरिकांच्या निघृण हत्या करण्यात आल्या. अशा धर्मांध विद्वेषापोटी घडवून आणलेल्या ह्या सैतानी कृत्याचा मठ छत्रपती शिवाजी महाराज चौक (मठ हायस्कूल जवळ) येथे ग्रामस्थांच्या वतीने रविवारी सकाळी तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी पाकिस्तान विरोधात या कृत्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी मठ सरपंच रूपाली नाईक माजी उपसरपंच निलेश नाईक, अजित नाईक, अनिल तेंडोलकर, रवींद्र खानोलकर, किशोर पोतदार, आबा मठकर प्रसाद मठकर, नित्यानंद शेणई, रवी मठकर, प्रशांत नाईक, कृष्णा मठकर, सुशीला नांदोस्कर, मेघा तेंडोलकर, संतोष नांदोसकर, बाबली परब, सुभाष मठकर आदी उपस्थित होते.