
सावंतवाडी : बदलापूर येथील शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाविकास आघाडीकडून सावंतवाडीत निषेध आंदोलन करण्यात आले. विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी शिवसेना शाखा येथे तोंडाला काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बाळा गावडे, तालुका संघटक मायकल डिसोजा, महिला आघाडी प्रमुख भारती कासार, उप तालुकाप्रमुख आबा सावंत, विभाग प्रमुख सुनील गावडे, महिला आघाडी शहर संघटन संघटक श्रुतिका दळवी, कल्पना शिंदे, विनोद ठाकूर, बाळू गवस, अशोक धुरी आदी उपस्थित होते.