पाणी पुरवठा शाखा अभियंता प्रफुल्लकुमार शिंदे यांची पदोन्नती

Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2023 11:36 AM
views 235  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला येथील पंचायत समिती पाणी पुरवठा  विभागात कार्यरत असलेले शाखा अभियंता यांना उपअभियंता पदी पाणी पुरवठा विभागात पंचायत वेंगुर्ले येथे पदोन्नती देण्यात आली आहे.


शिंदे हे शासनाच्या सेवेत सन २००० पासुन कार्यरत आहेत. त्यांनी यापुर्वी ओरोस उप अभियंता, सावंतवाडी शाखा अभियंता, कुडाळ व कणकवली उपअभियंता पदाचा अतिरीक्त कार्यभार सांभाळलेला आहे. सध्या वेंगुर्ले येथे शाखा अभियंता पदी कामकाज करीत होते. शासनाने १० ऑगस्ट २०२३ च्या शासन आदेशाने त्यांना ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग वेंगुर्ले येथे उपअभियंता (स्थापत्य ) गट-अ पदी पदोन्नती दिलेली आहे. या पदोन्नतीने वेंगुर्ले तालुक्याच्या पाणी पुरवठा विषयक कामांना गती मिळणार आहे.