सिंधुदुर्गात मनाई आदेश !

Edited by: ब्युरो
Published on: September 02, 2023 18:37 PM
views 754  views

सिंधुदुर्गनगरी : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण मुद्द्यावरुन घडलेल्या घटनेमुळे मराठा आरक्षण संघटना आक्रमक होऊन मराठा समाजाच्या वतीने  महाराष्ट्र राज्यात विविध मार्गाने सदर घटनेचा निषेध करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदर घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर  2023 या कालावधीत अपर जिल्हादंडाधिकारी  यांना असलेल्या अधिकारात  मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. 


 6 सप्टेंबर श्रीकृष्ण जन्माष्टमी,7.09.2023 रोजी दहीहंडी उत्सव पारंपारीक पध्दतीने साजरे करण्यात येणार आहे. यापुर्वी राज्यात सण / उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्हयात उमटुन जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राज्यातील सध्याची राजकिय परिस्थिती पाहता काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झालेले असुन काही राजकीय पक्षातील प्रतिस्पर्धी गट आपआपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन एकमेकांना लक्ष्य करत असुन त्यातुन काही ठिकाणी आंदोलनात्मक घटना घडलेल्या आहेत. त्याचे पडसाद जिल्हयात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सिंधुदुर्ग जिल्हयातील मराठा आरक्षण मुद्दा, आगामी होणारे सण / उत्सव निमित्ताने जिल्ह्यात आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम तसेच सध्याची राजकीय परिस्थितीमुळे जिल्हयात होणारी उपोषणे, निदर्शने, मौर्चा, रास्तारोको या सारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी या करिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि 37(3) प्रमाणे दिनांक 02.09.2023 रोजी 12.00 वाजलेपासून ते दिनांक 16.09.2023 रोजी 24.00 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.


 अपर जिल्हा जिल्हादंडाधिकारी यांना प्राप्त असलेले अधिकारात  सिंधुदुर्ग जिल्ह्यात  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) व 37 ( 3 ) नुसार दिनांक 02.09.2023 रोजी दु. 02.00 वाजलेपासून ते दिनांक 16.09.2023 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.