शेर्लेत 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा कार्यक्रम

Edited by:
Published on: December 10, 2023 19:49 PM
views 145  views

सावंतवाडी : तालुक्यातील शेर्ले ग्रामपंचायत येथे 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. शेर्ले ग्रामपंचायतने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 'हर घर जल ग्रामपंचायत' म्हणून घोषित करण्यात आले. तसे अभिनंदनाचे पत्र मान्यवरांच्या हस्ते सरपंच यांना प्रदान करण्यात आले. तसेच 'बॅटरी ऑपरेटर ट्राय सायकल'चे उद्घाटन सरपंच प्रांजल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार राजन तेली तसेच सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, विस्तार अधिकारी श्री. धर्णे, भाजपच्या महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर, तसेच शेर्ले गावाच्या सरपंच प्रांजल जाधव, उपसरपंच दीपक नाईक, ग्रामसेवक राजन नाईक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व शासकीय कर्मचारी, माजी सरपंच, पोलीस पाटील, भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, ग्रामस्थ देखील उपस्थित होते.