रेडी-म्‍हारतळेवाडी श्री देव ब्राह्मण नवरात्रोत्सव मंडळाचं यंदा 11 वं वर्ष !

सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन
Edited by: ब्युरो
Published on: October 13, 2023 17:49 PM
views 232  views

वेंगुर्ला : श्री देव ब्राह्मण नवरात्रोत्‍सव मंडळ रेडी-म्‍हारतळेवाडीचं यंदा ११ वर्ष आहे. याचं औचित्य साधून नवरात्रौत्सवानिमित्त विविध स्पर्धा दांडीया, गरबा, भजन, फुगडी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन १५ ऑक्‍टोबर रोजी  रेडी सरपंच रामसिंग राणे, सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, माजी आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसरपंच नमिता नागोळकर यांच्‍या उपस्‍थितीत होणार आहे.

या वर्षी प्रथमच या मंडळातर्फे बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात नेत्र तपासणी, रक्त तपासणी, डायबिटिस, तसेच महिलांच्या आजारांसाठी स्त्रीरोग तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रत्येक दिवशी गावा बाहेरील दांडीया ग्रुप, गोवा राज्यातील गरबा व दांडीया ग्रुप, रेकार्ड डान्स, फुगडी, भजन, फनी गेम्स, रेडी मर्यादित रस्सीखेच स्पर्धा, महिलासांठी पाककला स्पर्धा, या स्‍पर्धेतील विजेत्‍यांना ५ लिटर कुकर, तसेच खास खेळ पैठणीचा कार्यक्रमही यावेळी घेण्‍यात येणार आहे. या स्‍पर्धेतील विजेत्यांस ‘पैठणी’ बक्षीस देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत जास्तीत जास्त स्‍पर्धकांनी सहभाग घ्यावा, कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी नंदकुमार मांजरेकर ९४२२३८१८४४ व निलेश पांडजी यांच्याकडे संपर्क करावा, असे मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.