प्रा. रुपेश पाटील यांचे विविध स्पर्धा परीक्षांवर २१ रोजी व्याख्यान !

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागातर्फे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: January 18, 2023 14:43 PM
views 218  views

सावंतवाडी : दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल हळदीचे नेरूर येथे शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ९ वाजता 'एमपीएससी, यूपीएससी, तलाठी, ग्रामसेवक भरती व अन्य स्पर्धा परीक्षा' या महत्वपूर्ण विषयांवर प्रशालेच्या सर्व विद्यार्थी व या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परिसरातील सर्व युवा वर्गासाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत सुप्रसिद्ध व्याख्याते तथा स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील हे विविध स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

तरी सर्व लाभार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे कोकण  विभागाचे गणेश नाईक यांनी केले आहे.


विशेष टीप 

सदर कार्यशाळा ही दोन टप्प्यात होणार असून पहिल्या कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्यांनाच दुसऱ्या कार्यशाळेला प्रवेश दिला जाईल. कार्यशाळेला येणाऱ्यांनी वही व पेन घेऊन येणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी गणेश नाईक यांच्याशी ९८६०२५२८२५, ९४२२२६३८०२ संपर्क करावा.