प्रा. रमाकांत गावडे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान...!

Edited by: भगवान शेलटे
Published on: February 26, 2024 14:28 PM
views 167  views

बांदा : बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचे  कॉमर्स विभागचे प्रमुख  प्रा. रमाकांत गावडे यांना करिअर कट्टाउच्च तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या मार्फत उत्कृष्ठ तालुका समन्वयक म्हणून राजस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.  मुंबई येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जॉईन्ट डायरेक्टर पनवेल, ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, सोमया विद्यापीठाचे कुलगुरू पिल्लई सर आणि  सर्व महाविदयलयाचे  प्रध्यापक उपस्थित  होते. यावेळी त्यांचे बंधू सुरक्षा अधिकारी सिडको परशुराम गावडे उपस्थित होते. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार  मिळविल्याबद्दल  शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे अध्यक्ष मा. वारंग, उपाध्यक्ष प्रशांत कामत, प्राचार्य डॉ. काजरेकर आणि सर्व प्राध्यापकांनी  अभिनंदन केले.