प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त वराड कावळेवाडीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Edited by:
Published on: November 27, 2024 11:37 AM
views 203  views

मालवण : सहकारमहर्षी तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै. डी. बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वा. पर्यंत सहकारमहर्षी कै. प्रा. डी. बी. ढोलम स्मृतीस्थळ कावळेवाडी वराड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, यूरोलॉजी तपासणी, अस्थिरोग तपासणी, जनरल सर्जरी, नेफ्रोलॉजी तपासणी, कर्करोग तपासणी, दंतरोग चिकित्सा, प्रसुतीशास्त्र आणि स्त्री रोग तपासणी, मोफत रक्त तपासणी, इसीजी व औषधे दिले जाणार आहेत. तरी या आरोग्य शिबिराचा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन कै. डी . बी. ढोलम चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामविकास मंडळ कावळेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.