
देवगड : दीक्षित फाउंडेशन आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसेच आदर्श शिक्षक तसेच आदर्श संस्था पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षकांमधून प्रसाद बागवे प्राथमिक शिक्षकांमधून धर्मराज जोरात यांना आदर्श पुरस्कार दीक्षित फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले. तसेच संस्था पुरस्कार विद्या विकास मंडळ जामसंडे व नवलादेवी शिक्षण प्रसारक मंडळ सौंदाळे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी समन्वयक श्री. हिराचंद तानवडे यांनी बक्षीस वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैक्षणिक विचारमंचचे अध्यक्ष नारायण माने तर आभार माधव यादव यांनी मानले सूत्रसंचालन संजय गोगटे यांनी केले.
दीक्षित फाउंडेशन च्या वतीने तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेत नऊ हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.तसेच निबंध स्पर्धेत माध्यमिक शाळेच्या मुलांनी भाग घेतला याचा बक्षीस समारंभ दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श् निरंजन दीक्षित, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार अजित गोगटे, ज्येष्ठ अनंत करंदीकर, पू. ज. ओगले, भाई बांदकर देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.