
रत्नागिरी : खाजगी पसंत शाळा असुर्डे कासारवाडी तालुका चिपळूण या शाळेचे चार विद्यार्थी अक्षरगंगा सांगली यांच्यामार्फत घेण्यात येणारी प्रज्ञाशोध परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यात गुणवत्ता यादीत आले आहेत, गौरव मधुकर तांदळे इ १ली जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक, श्रेयश सुदर्शन शिंदे इ१ली जिल्ह्यात तृतीय क्रमां, जय लोकेश गुरव इ२री जिल्ह्यात तृतीय क्रमांक, श्लोक राजेश पालकर इ२री जिल्ह्यात तृतीय क्रमांक
सर्व गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यचे शिक्षणोत्तेजक मंडळ संचालित खाजगी पसंत शाळा असुर्डे कासारवाडी यांच्या वतीने गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वसंत शांताराम साळवी हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव महेंद्र नरोटे, सदस्य अशोक नरोटे, मोहन खापरे, ग्रामस्थ, पालक मुख्याध्यापिका उल्का उद्धव साळवी सहशिक्षिका सुनीता सुरेंद्र अवघडे, अंगणवाडी सेविका रसिका नरोटे, मदतनीस मीनाक्षी खापरे, सुगंधा खापरे उपस्थित होत्या.
कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वसंत साळवी यांनी कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाबद्दल तसेच विद्यार्थ्यां बद्दल गौरवोद्गार काढून अभिनंदन केले. शुभेच्छा दिल्या. तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व धन्यवाद दिले. असेच सदैव शाळेला यश मिळो अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ.साळवी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच पालक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.