प्रितेश राऊळ -स्वप्नाली घाडी यांचा थाटात विवाह

निलेश राणेंची खास उपस्थिती
Edited by: दिपेश परब
Published on: December 07, 2023 19:00 PM
views 517  views

वेंगुर्ला : जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती तसेच रेडी गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रितेश राऊळ व कुडाळ विद्युत वितरण विभागातील अधिकारी स्वप्नाली घाडी यांचा विवाह आज ७ डिसेंबर रोजी मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे यांनी या विवाह सोहळ्याला भेट देत उभयतांस शुभेच्छा दिल्या.

तसेच या विवाह सोहळ्याला माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब, संजू परब, बाबा परब, संजना सावंत, गोट्या सावंत, रेश्मा सावंत, अशोक सावंत, राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, शर्वाणी गावकर, शेखर गावकर, उन्नती धुरी, राजन मुळीक, पंकज पेडणेकर, हरी खोबरेकर, दादा कुबल, बाळू देसाई, सुहास गवंडळकर, नितीन मांजरेकर यांच्यासाहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत उभयतांस शुभेच्छा दिल्या.