
वेंगुर्ले : केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी मंत्री नारायण राणे यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य राहुल गावडे, भूषण सारंग उपस्थित होते.