दोडामार्ग शेतकरी - लाकूड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रीतम पोकळे

Edited by: संदीप देसाई
Published on: December 12, 2023 18:23 PM
views 98  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी कोनाळ येथिल प्रीतम प्रकाश पोकळे तर उपाध्यक्ष पदी शिवाजी गोविंद गवस यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुका शेतकरी व लाकूड व्यापारी संघटनेची महत्वपूर्ण सभा रविवारी सार्वजनिक गणेशउत्सव सभामंडप साटेली येथे सायंकाळी 3.00 वा.संपन्न झाली.

या बैठकीला तालुक्यातील शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. मागील कार्यकारणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने बैठकीच्या सुरवातीलाच नवीन  कार्यकारणी निवडी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित सभासदांनी अद्यक्ष पदासाठी प्रीतम पोकळे यांचे नाव एकमताने सुचविण्यात आले. व या नावास कुणाचाही विरोध नसल्याने त्याची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सन 2023 -24 या एक वर्षासाठी निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष: प्रीतम प्रकाश पोकळे, उपाध्यक्ष शिवाजी गोविंद गवस, जानू नवलू झोरे, सचिव ऋषिकेश सिताराम धर्णे, सहसचिव बाबला उगाडेकर, खजिनदार सचिन उगाडेकर, सहखजिनदार फ्रानसिस लोबो, गोपाळ अर्जुन परब, सदस्य रुपेश डोईफोडे, समीर चिरमुरे, गंगाराम कोळेकर, मशुद करोल, चंद्रकांत देसाई, सुभाष गवस शंकर हळदणकर, विठोबा पालयेकर, अभिजित देसाई, राधाकृष्ण देऊलकर, कृष्णा सावंत यांची निवड करण्यात आली.