वृक्षारोपणाने साजरा झाला मुख्याध्यापकांचा वाढदिवस

Edited by:
Published on: July 01, 2025 19:37 PM
views 26  views

बांदा : बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद  बांदा नं.१केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळा परिसरात विविध प्रकारची २५झाडे लावून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

मुख्याध्यापक असनकर हे पर्यावरण प्रेमी असून विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच पर्यावरण विषयक जनजागृती करणेसाठी त्यांनी वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.शाळेतील‌ इको क्लब व स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांच्या मार्फत शाळा परिसरात सुपारी,केळी तसेच विविध प्रकारची फुलझाडे लावली. मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी आपला वाढदिवस शाळा परिसरात वृक्षारोपण करुन साजरा केले बाबत शाळा व्यवस्थापन व सर्व शिक्षक वर्ग व पालक यांनी आभार व्यक्त केले.