पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकोट इथं दाखल

Edited by:
Published on: December 04, 2023 16:03 PM
views 322  views

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने मालवणच्या बोर्डिंग मैदान येथील हॅलीपॅड येथे आगमन झाल्यानंतर त्यांचा ताफा हा राजकोटसाठी रवाना झाला होता. आता राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. त्यांच्या  हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तेथून त्यांचा ताफा हा पुन्हा माघारी फिरून सागरी महामार्ग, बसस्थानक, भरड तारकर्ली नाका येथून तारकर्ली एमटीडीसी येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर तारकर्ली किनाऱ्यावर भारतीय नौसेना दीन साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीयमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यासह अन्य अतिमहनिय व्यक्ती उपस्थित आहेत.