पंतप्रधान तथा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे ठेकेदार घेत नाहीत : गणेशप्रसाद गवस

Edited by: संदीप देसाई
Published on: February 16, 2024 13:18 PM
views 83  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंतप्रधान तथा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे ठेकेदार घेत नसल्याची तक्रार शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कोल्हापूर येथील शिवसेनेच्या अधिवेशनात त्यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री यांना निवेदन देत लक्ष वेधले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. या कामांची टेंडर प्रक्रिया आठ वेळा लागली. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदार ही कामे घेत नसल्याने अनेक गावातील रस्त्यांची कामे थांबल्याने ग्रामस्थांचा रोष वाढला आहे. याबाबत काही तांत्रिक मुद्दे असतील तर त्याबाबत संबंधित विभागाची बैठक घेण्यात यावी व जिल्ह्याबाहेरील ठेकेदार इच्छुक असतील तर त्यांना ती कामे देण्यात यावी अशी मागणी गणेश प्रसाद गवस यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यावेळी सोबत राजू निंबाळकर, प्रेमानंद देसाई, शैलेश दळवी, गोपाळ गवस, दादा देसाई, रामदास देसाई, भगवान गवस,  विनायक शेटय़े आदी उपस्थित होते.