भात खरेदीसाठी २२०३ रुपये किंमत जाहीर : तुळशीदास रावराणे

Edited by:
Published on: December 11, 2023 19:28 PM
views 130  views

सिंधुदुर्गनगरी : किमान आधारभूत किंमत  खरेदी योजनेअंतर्गत  २०२३-२४ च्या खरीप पणन हंगामासाठी केंद्र शासनाने भात खरेदीची किंमत २२०३ रुपये जाहीर केलेली आहे.यासाठी ३९ धान खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांनी दिली. भात खरेदीसाठी ३९ धान खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेतअसेही त्यांनी सांगितले.

 जिल्हातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ व्हावा व हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जाणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व भात उत्पादक शेतक-यांसाठी  सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये ३९ धान खरेदी केंद्रे मंजूर केली आहेत.  सर्व भात उत्पादक शेतक-यांनी आपल्या ई- पिकाची नोंदणी केलेल्या ७/१२ नुसार आपल्या जवळच्या केंद्रावर लवकरात लवकर नोंदणी करावी.खरेदी विक्री संघ किवा मंजुर धान खरेदी केंद्राने भात खरेदीस सुरुवात केल्यावर आपले भात  विक्रीसाठी घेवुन जावे.  

शासनाच्या आधारभूत किमत साधारण एफ. ए.क्यू  २१८३ रुपये  व अ दर्जा २२०३ रुपये असुन जिल्हातील सर्व उत्पादक शेतक-यांनी या निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने भात विक्री करु नये असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती  तुळशीदास रावराणे यांनी सर्व शेतक-याना आवाहन केले आहे. यांची नोद शेतक-यांनी घ्यावी. शेतक-यांचे धान कमी दराने विक्रीस जाऊ

नये यासाठी सर्व धान खरेदी केंद्राने कटाक्षाने व काटेकोरपणे पालन करुन शेतक-यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. आधारभूत किमती पेक्षा कमी दराने धान खरेदी करणा-या व्यापा-यावर महाराष्ट्र कृषी उत्पन्न (विकास व विनियमन ) १९६३ नियम ३२(ड) अन्वये समितीमार्फत कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आहे.