बाळशास्त्री जांभेकरांचा वसा कायम ठेवा : प्रांताधिकारी पानवेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 06, 2024 16:16 PM
views 116  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत आहे. पत्रकारांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून हा वसा असाच कायम ठेवावा येथील पत्रकार सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात असे गौरवोद्गार सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी काढले. पत्रकार दिनानिमित्त सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.


यावेळी प्रेस क्लब च्या वतीने घरोघरी वृत्तपत्र वितरित करणाऱ्या सहा जणांना थंडी साठी सुरक्षा स्वेटर प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे सावंत भोसले,तहसिलदार श्रीधर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी कोकण महिला उपाध्यक्षा अर्चना घारे-परब, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी बबन राणे गजानन नाटेकर पुंडलिक दळवी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, विजय देसाई,प्रेस क्लबचे पहिले जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे,जिल्हाध्यक्ष अनंत जाधव,हेमंत खानोलकर अरूण वझे उपस्थित होते.


यावेळी पानवेकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारिता ही सर्वाना बरोबर घेऊन जाणारी आहे.असेच काम सर्वानी करावे असे आवाहन त्यांनी केले तसेच सावंतवाडीतील पत्रकार हे सर्व सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे स्पष्ट केले. तर युवराज लखमराजे यांनी सावंतवाडीतील पत्रकार हे राजकारणात नव्याने येणार्या ना संधी देत असतात हे बघून बरे वाटते अशा शब्दात कौतुक  केले.बबन साळगावकर यांनी तर आपण प्रेस क्लब च्या पहिल्या दिवसापासून सोबत आहे.ही सोबत अशीच कायम राहिल असे सांगितले त्यामुळेच सर्वानी नेहमी जनतेला अभिप्रेत काम करावे असे आवाहन केले.आपण सदैव तुमच्या सोबत असल्याचे ही त्यांनी सांगितले.

अशोक दळवी यांनी येथील पत्रकारांना धन्यवाद देतना सर्वानी मिळून विकास कामात सहकार्य करता तसेच सहकार्य भविष्यात ही करावे आणि या जिल्ह्याला विकास कामात अग्रेसर राहुया असे आवाहन ही दळवी यांनी यावेळी केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले अर्चना घारे-परब पत्रकार अभिमन्यू लोंढे सिताराम गावडे यांनी ही आपले विचार मांडले. तसेच पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच पत्रकार काय करू शकतो हे पटवून दिले.यावेळी प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष अनंत जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला पत्रकार उमेश सावंत राकेश परब संजय भाईप लक्ष्मण आढाव,संदेश पाटील आनंद धोंड शैलेश मयेकर मकरंद मेस्त्री मदन मुरकर संदेश कारिवडेकर नयनेश गावडे संजय पि॓ळणकर संदिप राऊळ विशाल सावंत उपस्थित होते.