
देवगड : देवगड आयोजित व आमदार नीतेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सवाच्या समारोप सोहळ्याला दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वा. आमदार नीतेश राणे व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव उपस्थित राहणार आहेत. इंद्रधनू, देवगड आयोजित व आमदार नीतेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सव ३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला. दरदिवशी या नवरात्र उत्सवाला तुफान गर्दी होत असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धा व नवरात्र उत्सवाचा समारोप सोहळा आमदार नीतेश राणे व सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थितीत होणार आहे.सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील "काहे दिया परदेस" ही तिची मालिका विशेष गाजली. सायली संजीव ही मूळची धुळे येथील असून तिचे शालेय तसेच पदवी शिक्षण नाशिक येथे झाले. काहे दिया परदेस आणि परफेक्ट पती या मालिकांत काम करण्यासोबतच तिने पोलीस लाईन,आटपाडी नाईट्स, एबी आणि सीडी आणि सातारचा सलमान या चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. "गोष्ट एका पैठणीची" या चित्रपटातील भूमिकेसाठी सन २०२० चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या झिम्मा-२ या चित्रपटात सायली संजीव ची महत्वाची भूमिका केल्या आहेत.