प्रमोद कामत मित्रमंडळातर्फे प्रेरणा भोसलेचा सत्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: January 08, 2026 17:02 PM
views 57  views

सावंतवाडी : मुंबई विरार येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बांदा खेमराजच्या कु.प्रेरणा भोसले हिने सुवर्णपदक पटकवत घवघवीत यश संपादन केले होते.या तिच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल प्रमोद कामत मित्रमंडळाच्या वतीने बांद्यात अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तथा माजी सभापती प्रमोद कामत व माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्याहस्ते प्रेरणा भोसले हिला गौरविण्यात आले.

यावेळी उद्योजक निलेश नाटेकर, भारतीय जनता पार्टी युवामोर्चा सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, माजी सरपंच दीपक सावंत, वाफोली उपसरपंच विनेश गवस, डेगवे माजी सरपंच मधुकर देसाई, बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, भाजप मंडळ संयोजक गुरुदत्त कल्याणकर, दर्पण आळवे, साईनाथ धारगळकर, घनश्याम सावंत, सुनील धमापूरकर, नेतर्डे ग्रामपंचायत सदस्य कैलास गवस आदी उपस्थित होते. यावेळी प्रेरणा हिला दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रमोद कामत मित्रमंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.