आमदार वैभव नाईक यांना प्राथमिक जबाब नोंद, चौकशीसाठी ACB ची नोटीस !

उद्या 11 वाजता रत्नागिरी ACB च्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 04, 2022 18:52 PM
views 257  views

कणकवली : आमदार वैभव नाईक यांना प्राथमिक जबाब नोंद, चौकशीसाठी पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी ५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता येण्याबाबत नोटीस बजावली आहे.

आमदार वैभव विजय नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून उघड चौकशी क्रमांक ०१ / २०२२ अन्वये मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. उघड चौकशीच्या अनुषंगाने दिनांक १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील आपले उत्पन्न, सर्च व मालमत्ता याबाबत मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स त्यामध्ये नमुद मुद्दयांच्या अनुषंगाने त्वरीत भरून देणेसाठी व मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स मधील आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला जबाब नोंद करावा,याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

याबाबत १२ ऑक्टोंबर २०२२, ०९ नोव्हेंबर २०२२, ३० नोव्हेंबर २०२२ व दिनांक ०१ डिसेंबर २०२२ रोजी ११.०० वाजता पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय नाचणे रोड, मारुती मंदीर येथे उपस्थित रहाणेबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये समक्ष व ई मेलव्दारे कळविण्यात आलेले आहे. परंतु नमुद दिनांकास वैभव नाईक हे उपस्थित राहिले नाही.

उघड चौकशीच्या अनुषंगाने आपल्याकडे चौकशी करून, आपला प्राथमिक जबाब नोंद करणे आवश्यक असल्याने आपण दिनांक ०५ डिसेंबर २०२२ रोजी ११.०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे, अशी नोटीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी पोलीस उपधीक्षक सुशांत चव्हाण यांनी बजावली आहे