कणकवली कॉलेजची प्रतिक्षा पाटील कणकवली तालुक्‍यात प्रथम

प्रथम तीन क्रमांकांवर मुलींचीच मोहोर
Edited by:
Published on: May 02, 2026 18:32 PM
views 40  views

कणकवली : बारावी परिक्षेत कणकवली तालुक्‍यात कणकवली महाविद्‍यालयाच्‍या विद्‍यार्थ्यांनी सर्वाधिक चांगले यश मिळविले. तालुक्‍यात कणकवली महाविद्‍यालयाच्‍याच दोन विद्‍यार्थिनी अनुक्रमे प्रथम व द्‍वितीय आल्‍या आहेत. विशेष म्‍हणजे तालुक्‍यात प्रथम तीन क्रमांकांवर मुलींनीच मोहोर उमटवली. यात कणकवली महाविद्‍यालयाची वाणिज्‍य शाखेची प्रतिक्षा संजय पाटील हिने ९२.८३ टक्‍के गुण मिळवून प्रथम, याच महाविद्‍यालयाची शास्‍त्र शाखेची सुकन्‍या संजय राणे हिने ९१.६७ टक्‍के गुण मिळवून द्‍वितीय तर आयडियल इंग्‍लिश स्‍कुलची शास्‍त्र विभागाची दिया जयराम प्रभूदेसाई हिने ९१.१७ टक्‍के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्‍त केला.


कणकवली तालुक्‍यातून एकूण १८२० विद्‍यार्थी परिक्षेस बसले होते. त्‍यातील १७३२ विद्‍यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९५.९५ टक्‍के लागला. तालुक्‍यातील तब्‍बल चार कनिष्‍ठ महाविद्‍यालयांचा निकाल १०० टक्‍के लागला आहे. यामध्‍ये कळसुली, कनेडी, मराठे हायस्‍कुल फोंडाघाट, तळेरे मालंडकर कॉलेज या चार कनिष्‍ठ महाविद्‍यालयांचा समावेश आहे.