
कणकवली : खारेपाटण येथील मफतलाल विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल यंदा ९७.५८ टक्के लागला आहे. एकूण २०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शास्त्र विभागात ८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
प्रथम – तेहसीन मुस्ताक पटेल (७९.६७%)
द्वितीय – उक्बा गफार काझी (७५.५०%)
तृतीय – महाविश इरफान मुल्ला (७४.३३%)
कला विभागात २२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९५.४५ टक्के लागला आहे.
प्रथम – दुर्वेश पांडुरंग पवार (६३.३३%)
द्वितीय – प्रतिक नारायण धुरी (६२.५०%)
तृतीय – आशा बबन पुरीगोसावी (५६.३३%)
वाणिज्य विभागात ६८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ६६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९७.०५ टक्के लागला आहे.
प्रथम – राजेश चंद्रकांत गोसावी (८२.८३%)
द्वितीय – विद्या मारुती कुडाळकर (८१.८३%)
तृतीय – साक्षी विजय शिरकर (७३.५०%)
एकूणच मफतलाल विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत सर्व विभागांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.










