माध्यमिक शालांत परीक्षेत उभादांडा हायस्कुलची प्रतिक्षा नाईक मराठी विषयात जिल्ह्यात प्रथम

Edited by: दिपेश परब
Published on: June 11, 2023 13:01 PM
views 319  views

वेंगुर्ला : मार्च २०२३ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत न्यू एज्युकेशन सोसायटी उभादांडा संचलित न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा हायस्कूल मधील प्रतीक्षा प्रदीप नाईक या विद्यार्थिनीने मराठी विषयात ९९ गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी विषयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच तिने ९८.२० टक्के गुण मिळवून वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. दरम्यान याच विद्यालयातील नम्रता हेमकांत कुर्ले व सानिका काशिनाथ रेवणकर यांनी मराठी विषयात ९७ गुण आणि पूर्वा विनोद राजध्यक्ष व आनंद किरण कारेकर यांनी मराठी विषयात ९८ गुण प्राप्त केले आहेत. 

या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक दीपक बोडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन विरेंद्र कामत आडारकर, उपाध्यक्ष रमेश पिंगुळकर, संस्था सचिव रमेश नरसुले व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक- शिक्षक, संघ सदस्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले आहे.