
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतारी नाट्यकलेत स्त्री पात्रांमधून अत्यंत समर्पित आणि सशक्त अभिनय सादर करणारे प्रसिद्ध कलाकार प्रशांत मेस्त्री यांचे विजेचा धक्का लागून दुर्दैवी निधन झाले. या घटनेने कोकणातील संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे, अशा शब्दांत शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
दशावतार या पारंपरिक नाट्यकलेच्या विश्वात मेस्त्री यांचे योगदान मोठे असून त्यांची अनुपस्थिती ही मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. प्रशांत मेस्त्री हे दशावतारी रंगभूमीवरील एक प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी स्त्री पात्रांमधून साकारलेला अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे. त्यांच्या जाण्याने कोकणच्या लोककलेला मोठा धक्का बसला आहे, अशा शब्दांत आंग्रे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.