
वैभववाडी : शासनाच्या महाराष्ट्र राज्य सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिक परिषद सदस्य पदी कणकवली येथील प्रशांत गुळेकर यांची निवड करण्यात आली आहे.राज्यभरातून २१सदस्यांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्लीनीकल लॅबोरेटरी प्रतिनिधी म्हणून श्री.गुळेकर यांची निवड झाली.
गुळेकर हे कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील असून त्यांच्या खारेपाटण,तळेरे व वैभववाडी येथे क्लीनीकल लॅबोरेटरी आहेत.या व्यवसायाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ते रुग्णांना सेवा देत आहेत.राज्य सरकारने त्यांची राज्य सहयोगी आणि आरोग्यसेवा व्यावसायिक परिषदेच्या सदस्यपदी निवड केली आहे.त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केले जात आहे.