प्रशांत दामलेंची वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेला भेट

Edited by:
Published on: January 24, 2025 16:37 PM
views 129  views

सावंतवाडी : 'एका लग्नाची, पुढची गोष्ट' या नाटकाच्या निमित्ताने नाट्यसृष्टीतील विक्रमादित्य, अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सावंतवाडी मध्ये आले होते. प्रयोगात पूर्वी सावंतवाडीतील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

या अर्ध्यातासाच्या भेटी दरम्यान त्यांना वेदपाठशाळेची माहीती दिली. पाठशाळेतील वैदिक आणि याज्ञिक शिक्षणाची माहिती पाठशाळेचे गुरुजी वेदमूर्ती भूषण केळकर गुरुजी यांनी दिली. संस्थेच्या कामकाजाची माहीतीही त्यांनी जाणून घेतली. याच बरोबर सावंतवाडीतील नाट्यचळवळीबाबत त्यांच्याशी  चर्चा केली. सद्यस्थितीत  सावंतवाडी येथील बॅ नाथ पै सभागृहातील अपुऱ्या सुविधा त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या ज्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी प्रयोगादरम्यान घेतला . 

प्रचंड लोकप्रियता मिळवलेला  विक्रमवीर नाट्यअभिनेता  आणि एक यशस्वी नाट्यनिर्माता असून देखील अगदी आपुलकीने आपलेपणाने त्यांनी चर्चा केली. केवळ रंगमंचावरच नव्हे तर रंगमंचाबाहेरही प्रचंड उर्जा असलेल्या प्रशांत दामले यांच्यासह घालवलेला वेळ नाट्यकर्मीसाठी प्रेरणा देणारा होता. पाठशाळेचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत वावदे यांच्यामुळेच ही भेट घडून आली. यावेळी पाठशाळेचे कार्यवाह शिवानंद भिडे, बाळ पुराणीक, खजिनदार गणेश दीक्षित, श्रीकांत वावदे , वेदमूर्ती श्री केळकर गुरुजी, तेजस प्रभुदेसाई, कु. आर्य पुराणिक तसेच पाठशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.