पत्रकार संरक्षण समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रसाद मडगांवकर, सचिवपदी शैलेश मयेकर

संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी केली नियुक्ती
Edited by: विनायक गांवस
Published on: February 18, 2023 14:38 PM
views 296  views

सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नावलौकिक असलेल्या "पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र)" ची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून, समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी नियुक्तीपत्र प्रदान करत प्रसाद भास्कर मडगांवकर यांची जिल्हाध्यक्षपदी, तर सचिवपदी शैलेश सुदाम मयेकर यांची नियुक्ती केली आहे.

पत्रकार संरक्षण समिती जिल्हा कार्यकारिणीच्या खजिनदारपदी वासुदेव उर्फ नयनेश गावडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सखाराम पिळणकर, जिल्हा संघटक जाफर शेख, सहसचिव यशवंत कृष्णा माधव तर सहखजिनदार पदी मदन शंकर मुरकर यांची निवड करण्यात आली आहे.

      महाराष्ट्र राज्याच्या २९ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या,शहरी व ग्रामीण  पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांना न्याय देणाऱ्या पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष  विनोद पत्रे यांनी दूरध्वनीवरून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या सर्व सभासद पदाधिकाऱ्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.