जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत प्रसाद खडपकर प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे आयोजन
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 10, 2022 15:06 PM
views 184  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आयोजित जिल्हास्तरीय वाचक स्पर्धा येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय व ग्रंथसंग्रहालय (जिल्हा ग्रंथालय ) येथे झाली. यात १. प्रसाद विश्वनाथ खडपकर (वेंगुर्ले), २. हेमंत पाटकर (कणकवली ३. विभूती विजय ठाकुर (कुडाळ ४. अंकिता सुहास नाईक (मळगाव- सावंतवाडी), ५. अपूर्वा आरेष भोगले (देवगड) यांनी यश मिळविले.

या स्पर्धेत कै. विजया वामन पाटणकर वाचनालय कुडाळ, नगर वाचनालय कणकवली, उमाबाई बर्वे ग्रंथालय देवगड, नगर वाचन मंदिर मालवण व नगर वाचनालय वेंगुर्ले ही तालुका ग्रंथालये आणि कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव सावंतवाडी यांनी आपल्या तालुक्यात तालुकास्तरीय वाचक स्पर्धा घेऊन त्यातील तीन विजेत्यांना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला होता.

जिल्हा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाग्रंथालय संघाचे कार्यवाह मंगेश मसके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. ग्रंथालय संघाचे सहकार्यवाह महेश बोवलेकर, सदस्य भरत गावडे, विठ्ठल कदम, राजन पांचाळ, परीक्षक प्रा. अरुण मर्गज आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत पंधरा स्पर्धक सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर मंगेश मसके, भरत गावडे, महेश बोवलेकर, विठ्ठल कदम, राजन पांचाळ, सतीश गावडे, जयेंद्र तळेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक राजन पांचाळ, तर आभार विठ्ठल कदम यांनी मानले.