कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी प्रसाद अरविंदेकर

Edited by:
Published on: December 11, 2023 19:59 PM
views 141  views

सावंतवाडी : अमेचेर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी येथील प्रसाद अरविंदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फेडरेशनची नव्या कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच दिल्ली येथे पार पडली. यात २८ राज्य व ८ केंद्रशासित राज्याचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ही निवडणूक प्रक्रिया तेलंगणा राज्याचे निवृत्त न्यायाधीश आर. के. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या निवड प्रक्रियेत श्री. अरविंदेकर यांना बिनविरोध संधी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.