महायुतीचा आपला हक्काचा खासदार संसदेत पाठवा : प्रमोद जठार

Edited by: दिपेश परब
Published on: March 19, 2024 14:44 PM
views 357  views

वेंगुर्ले : येणाऱ्या लोकसभा निवडणुकी नंतर संपूर्ण देशभर ४०० पेक्षा जास्त खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत संसदेत बसतील यासाठी संपूर्ण देश संपूर्ण भाजप पक्ष कामाला लागला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये या या लोकसभेचा उमेदवार हा महायुतीचा असणार आहे. जो उमेदवार आमचे वरीष्ठ देतील त्याला निवडून आणणे हा एकमेव अजेंडा कार्यकर्त्यांचा आहे. जे जाहीरनाम्यात तेच पुढचा ५ वर्षात पूर्ण करणे अशा प्रकारची कार्यपद्धती भाजपची आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील व्यापारी, शिक्षक संघटना, व्यावसायिक, विविध समाज प्रमुख, विविध धर्माचे प्रमुख व ज्या ज्या लोकांना देशाच्या निर्माणसाठी, लोकांच्या कल्याणासाठी काम करायच आहे त्यांची भेट घेऊन त्यांच्या काही योजना असतील, त्यांची काही स्वप्न असतील ती आमच्या या अजेंड्यामध्ये येणार असल्याची महिती भाजपाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली.

    यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, कोकणात असलेली बेरोजगारी दूर करणे हा आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा असणार आहे. आगामी काळात करोडो रुपये निधी केंद्राकडून आणून पर्यटनाचे प्रकल्प केले जाणार, रोजगार निर्मिती केली जाणार, इथला तरुण इथेच टिकेल, इथेच डॉक्टर, इंजिनिअर होणारी मूल इथेच काम करतील यासाठी काम आम्ही पुढच्या १० वर्षात करणार आहोत आणि याची गॅरंटी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात देत आहोत. यामुळे या भागात पुन्हा महायुतीचा खासदार पूर्ण ताकतीने निवडून द्या. आपला हक्काचा खासदार संसदेत पाठवा असे आवाहनही प्रमोद जठार यांनी केले. भाजपच्या उर्वरित उमेदवारांची दुसरी यादी येत्या २ दिवसात जाहीर होईल. पक्षाचे पक्षश्रेष्ठी जो कोकणच्या विकासासाठी योग्य उमेदवार उमेदवार देतील त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने काम करणार असल्याचेही जठार यावेळी म्हणाले. 

  यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, साईप्रसाद नाईक, सोमनाथ टोम्बके, वसंत तांडेल, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, मनवेल फर्नांडिस, अभि वेंगुर्लेकर, प्रणव वायंगणकर, प्रसाद पाटकर, वृंदा गवंडळकर यांच्यासाहित भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.