
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रसाद लाड आदी मान्यवर उपस्थित होते.










