कणकवलीत भाजप महिला सेलचा विराट मोर्चा

महिला विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याचा केला निषेध
Edited by:
Published on: April 30, 2026 19:19 PM
views 31  views

कणकवली : महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियम विधेयकाला काँग्रेस व इंडिया आघाडीने विरोध केल्याच्या केल्याबाबत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांच्यातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या निषेध पदयात्रेला जिल्हाभरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असल्याने हा मोर्चा विराट स्वरूपाचा ठरला. मोर्चा दरम्यान सहभागी महिलांनी 'महीला विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचा निषेध असो' यासह विविध जोरदार घोषणा दिल्या. 

नितेश राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांना संसदेत हक्काचे स्थान मिळवून देत होते. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केला. काँग्रेस पक्ष नेहमीच महिलांच्या विरोधात राहिला आहे. ट्रिपल तलाक किंवा महिलांसाठीच्या प्रत्येक योजनेला काँग्रेस पक्षाने विरोधच केला आहे. त्यामुळे काँग्रेसची प्रवृत्ती घराघरात पोहोचवा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले. 

निषेध मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, लखमराजे भोसले, कणकवली सभापती हर्षदा वाळके, जि. प. सदस्या सावी लोके,  प्रज्ञा राणे, वैभववाडी तालुकाध्यक्षा प्राची तावडे, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, नगरसेविका सुप्रिया नलावडे, यांच्यासह जिल्हाभरातील महिला भाजपचे पदाधिकारी, महीला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.