
कणकवली : महिलांना सन्मान देण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा तेव्हा काँग्रेसने विरोध केला. देशाच्या विकासात महिलांचा हातभार लागावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला विधेयक आणले होते. मात्र त्यालाही काँग्रेसने विरोध केला. म्हणूनच आजचा निषेध मोर्चा हा भावना व्यक्त करण्यासाठी आहे. महिलांनी काँग्रेसची प्रवृत्ती ओळखावी व ती प्रत्येक घराघरात पोहोचवावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
महिला विधेयकाला काँग्रेस व इंडिया आघाडीने विरोध केल्याच्या निषेधार्थ कणकवलीत भाजप महिला सेलच्या वतीने आयोजित भव्य विराट मोर्चाचे सभेत रूपांतर झाले, त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, लखमराजे भोसले, कणकवली सभापती हर्षदा वाळके, जि. प. सदस्या सावी लोके, प्रज्ञा राणे, वैभववाडी तालुकाध्यक्षा प्राची तावडे, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, नगरसेविका सुप्रिया नलावडे, यांच्यासह जिल्हाभरातील महिला भाजपचे पदाधिकारी, महीला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










