मुटाट गाव तंटा मुक्ती अध्यक्षपदी प्रकाश भेकरे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 23, 2024 13:12 PM
views 403  views

देवगड : देवगड  मुटाट गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी प्रकाश भेकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .प्रकाश भेकरे  याची 'महात्मा गांधी तंटामुक्त समिती, मुटाट अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे या निवडीबद्दल प्रकाश भेकरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानत दिलेल्या पदाला न्याय देऊन गावातील तंटे गावातच मिटवले जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनदिले.देवगडतालुक्याती ल धडाडीचे शिवसेना कार्यकर्ते तंटामुक्त समितीअध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले मनमिळाऊ, दिलदार स्वभाव प्रत्येकाशी नाते जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकाश भेकरे यांचे  सर्वांनी अभिनंदन केले आहे.

आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.ग्रामपंचायत मुटाट येथे निवड होण्याच्या कार्यक्रमावेळी आपल्या हातून गावातील तंटे मिटून आपला गाव आदर्श होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश भेकरे यांनी आपले मत मांडले.