'कविता वर्षावसाच्या.. कविता परिवर्तनाच्या' कार्यक्रम स्तुत्य

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांचे प्रतिपादन
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 03, 2025 14:31 PM
views 142  views

कणकवली : सम्यक साहित्य संसद संस्थेने आयोजित केलेला 'कविता वर्षावसाच्या... कविता परिवर्तनाच्या' हा साहित्यिक कार्यक्रम स्तुत्य आहे. ही संस्था सामाजिक परिवर्तनसाठी सर्वांनासोबत घेऊन काम करीत आहे. कविता वर्षावसाच्या कविता परिवर्तनाच्या या कार्यक्रमातून जुन्या-नव्या कवींच्या कविता रसिकांना ऐकायला मिळत आहेत. सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य संसद संस्थेने घेतलेल्या पुढाकारामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक परिवर्तन झालेले दिसून येईल, अशा आशावाद ज्येष्ठ कवी, कांदबरीकार, संवादक, लोककला अभ्यासक डॉ. महेश केळूसकर यांनी व्यक्त केला.

सम्यक साहित्य संसद संस्थेच्यावतीने कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल हॉल येथे 'कविता वर्षावसाच्च्या कविता परिवर्तनाच्या' हा कार्यक्रम आयोजित केला होता. याचे उद्‌घाटन डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सम्यक साहित्य संसद संस्थेचे अध्यक्ष इंजि. अनिल जाधव, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी प्रा. प्रवीण बांदेकर, कार्यवाह राजेश कदम, कोषाध्यक्ष संध्या तांबे, सिद्धार्थी तांबे, प्रा. राजेंद्र मुंबरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवीण बांदेकर म्हणाले, वसंत सावंत यांनी सिंधुदुर्गात साहित्याचे बीज रोवले. या बीजातून जिल्ह्यात एक मोठा वटवृक्ष तयार झाला आहे सिंधुदुर्ग साहित्य संस्था स्थापन आली. या संस्थेशी जोडलेले कवी महाराष्ट्रात नावारुपास आले. सिंधुदुर्गातील साहित्य प्रवासाचा मी आणि महेश केळुसकर साक्षीदार आहे. जिल्ह्यातील साहित्य चळवळीत मी ३५ वर्षे काम करीत आहे. सम्यक साहित्य संसद संस्थेने आयोजित केलेल्या 'कविता वर्षावसाच्च्या कविता परिवर्तनाच्या' या कार्यक्रमातून पावसाच्या कवितांचा एकप्रकारे जागर केला आहे. सिंधुदुर्गात आबा शेवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपल्या कवितांमधून मांडला आहे. डॉ. आंबेडकरांचा विचार परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सम्यक साहित्य संसद संस्थेला परिवर्तनाची आस असल्याने संस्थेने हा कार्यक्रम आयोजित किला आहे. या कार्यक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा आशयधन आविष्कार अनुभवयाला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकेत सिद्धार्थ तांबे यांनी सम्यक साहित्य संसद संस्थेच्या कार्याचा आढावा घेत कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितले, यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आ.बा. शेवरे यांच्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच सुनील तांबे यांच्याही पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अभारप्रदर्शन संदेश तांबे यांनी केले यावेळी कवी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.